top of page

आमच्या बद्दल

मनोरमा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीमध्ये आपले स्वागत आहे 

मनोरमा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.,सोलापूर या आपल्या मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीचे कार्यक्षेत्र  महाराष्ट्र राज्य व कर्नाटक राज्य आहे. सोलापूर शहर व जिल्यातील आर्थिक विकासामध्ये योगदान देणारी मनोरमा मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी ११ वर्ष पूर्ण करून १२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीच्या कामकाजाला ०१ ऑगस्ट २०११ रोजी शुभमुहूर्तावर ग्राहक सेवेस सुरुवात केली. मनोरमा बँकेचे मार्गदर्शक श्री. श्रीकांत मोरे साहेब व सौ.शोभा श्रीकांत मोरे यांच्या सेवाभावी व अमुल्य मार्गदर्शनाखाली मागील २५ वर्ष परिवाराच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस  वाढता चाललेला दिसून येतो. मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीने ठेवी, कर्ज वाटप आदी आर्थिक व्यवहारात उल्लेखनीय प्रगती केलेली आहे. आपणा सर्वांच्या सहकार्याने ‘जो जे वांछील, तो ते लाहो’ या उक्तीप्रमाणे सुरु झालेल्या आपल्या मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीने मागील ११  वर्षात केलेल्या प्रगती उल्लेखनीय आहे.

bottom of page